विशाखा व अतुल हे मुंबईकर पतीपत्नी पळसवाडी या आदिवासी भागात राहायला येतात. वैद्यकीय शिक्षण घेतलेली विशाखा तेथे व आसपासच्या वाड्यांमध्ये जाऊन रहिवाशांना आरोग्य सेवा देत असते. अतुल आदिवासींचे छोटेमोठे प्रश्न सोडवीत त्यांचे जगणे सोपे करण्याचा प्रयन्त करीत असतो.
अतुलला आदिवासी जमिनींबाबत ब्रिटीश काळातील काही पुरावे मिळतात. या प्रश्नावर अतुल काम सुरु करतो. त्यात तो गुंतून पडतो. इकडे विशाखा वाडी व वाडीतील माणसांमध्ये गुंतते. लग्नाला चार वर्षे झाल्याने तिला मुल हवे, असे वाटू लागते.
सुरुवातीला कामात अडथळा येईल म्हणून नकार देणारा अतुल राजी होतो. बाळ होणार, याची चाहूल लागल्यावर विशाखाला मुंबईला कायमचे राहायला जाऊ म्हणतो; पण विशाखा त्याला ठाम नकार देते. शिवाय कामासाठी अतुलला एक वर्ष दिल्लीला जाण्यास परवानगी देते. शिवाय कामासाठी अतुलला एक वर्ष दिल्लीला जाण्यास परवानगी देते.
त्या काळात ती पळसवाडीतच राहण्याचा निर्णय घेते. मिलिंद बोकील यांच्या 'मार्ग' कादंबरीचे हे कथानक. पतीपत्नीमधील गाढ प्रेम, विश्वास, तरी प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपण्याचा प्रयन्त, आदिवासींचे जीवन, तेथील निसर्ग, माणसांचा स्वभाव यातून उलगडतो. शिवाय समाजसेवा करणे म्हणजे काय, हे यातून दाखविले आहे
Author: Milind Bokil | Publisher: Mouj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 119