माहीमची खाडी (Mahimchi Khadi)

By: Madhu Mangesh Karnik (Author) | Publisher: Majestic Publishing House

Rs. 200.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

तत्कालीन मध्यमवर्गीय वाचकाला अपरिचित जगाचं दर्शन घडविणारी ‘माहीमची खाडी’ प्रसिद्ध झाली आणि साहित्यजगतात या कादंबरीच्या रूपाने एक वादळ घोंगावत आलं.

झोपडपट्टीतील जीवनाचे आणि त्यातील समस्यांचे वास्तववादी चित्रण ‘माहीमची खाडी’ मधून घडते. झोपडपट्टीतलं सर्व थरावरचं दारिद्र्य, हातावर पोट घेऊन आला दिवस ढकलणारे लोक, काळे धंदे, बेकारी, दारू, मटका यांची व्यसनं, भविष्याचा विचार न करता काहीही करून जगण्याची धडपड, जुन्या पिढीतील नष्ट होत जाणारी ऊब, कौटुंबिक जीवनातील जीवघेणी विदारकता, जन्म घेणाऱ्या बालकांच्या आणि त्यांच्या आयांच्या असह्य यातना, मृत्यू, तरुणांच्या गॅंगचं असंस्कृत वागणं आणि जगणं. स्त्री-पुरुषांचे शारीर पातळीवरचे संबंध या सर्वांचे समूहचित्रण प्रत्ययकारीपणे या कादंबरीत घडते.

Details

Author: Madhu Mangesh Karnik | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 169