Mrityu Ek Atal Satya ( मृत्यू एक अटळ सत्य ) | Book By Sadguru
मृत्यू किंवा मृत्यूबद्दलचा उल्लेखही अनेक समाजांमध्ये निषिद्ध मानला जातो. पण आपला हा दृष्टिकोन पूर्णपणे चूक असला तर? मृत्यूकडे एक आपत्ती म्हणून नाही, तर जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू, ज्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीच्या अनेक शक्यता दडल्या आहेत, अशा प्रकारे पाहता येईल का? अगदी पहिल्यांदाच कोणीतरी हे सांगत आहे.
या अगदी विलक्षण पुस्तकातून, सद्गुरू त्यांच्या आंतरिक अनुभवाच्या प्रगाढ सामर्थ्यातून, मृत्यूबद्दल क्वचितच बोलले जातील, अशा काही पैलूंचा उलगडा करतात. एखाद्याने त्याच्या मृत्यूसाठी कशा प्रकारे तयारी करावी, मृत्युशय्येवर असणाऱ्या कोणासाठी आपण काय करू शकतो आणि मृत्यूनंतरच्या त्यांच्या प्रवासासाठी कशी मदत होऊ शकते, या सर्व गोष्टींबद्दल एका अतिशय व्यवहारी दृष्टिकोनातून ते आपल्याला सांगतात.
लेखकाविषयी :
सद्गुरू - एक आत्मज्ञानी, योगी आणि दूरदर्शी आहेत. सद्गुरू हे एक आगळेवेगळे आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांच्या आकलनाची स्पष्टता त्यांना केवळ अध्यात्मिकच नव्हे; तर व्यवसाय, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांमध्ये एक अनोखी जागा प्रदान करते. भारतातील पन्नास प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळवलेले सद्गुरू ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते’ म्हणून ओळखले जातात. त्यांना असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ प्रदान करण्यात आला आहे.
Author: Sadhguru | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 389