'मेंदूची मशागत' या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरचे विविध भाव वाचायला मिळतात. या पुस्तकाची नाळ गावाच्या मातीशी जोडलेली आहे, कारण देवा झिंजाड हे गावगाड्याचे लेखनाच्या माध्यमातून अवलोकन करणारे आहेत. ते शहरात राहत असले तरी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा कठीण काळ गावात गेलेला आहे. त्या संघर्षाच्या अनुभवांना त्यांनी या लेखांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहे. त्यातून अनेक ज्वलंत विषयांना त्यांनी तोंड फोडले आहे. वाचनसंस्कृतीचं महत्त्व देवा झिंजाड वारंवार ठळक करतात. वाचनातून फक्त माहिती नाही तर आपल्या मनाची आणि मेंदूचीही मशागत होते. ध्येय साकारण्यासाठी मेहनत आणि व्हिजन लागतं तसंच वाचनही महत्त्वाचं आहे. 'मेंदूची मशागत' या पुस्तकातून झिंजाड यांनी लहानपणापासून आलेले अनुभव छोट्या छोट्या प्रकरणांच्या माध्यमातून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहिले आहेत आणि त्या अनुभवातून अनमोल संदेश दिला आहे. शेवटी मोबाइलमुळे डोक्यातील मेंदू हातांच्या बोटांमध्ये उतरला आहे. त्या मेंदूला परत डोक्यात आणण्यासाठी त्या 'मेंदूची मशागत' होणं गरजेचं आहे.
Author: Deva Zinjad | Publisher: New Era Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 212