रामाच्या पावलांवर पाऊल
रामायणातील प्रत्येक स्थानाला भेट देत केलेला प्रवास
लेखक : विक्रांत पांडे , निलेश कुलकर्णी
अनुवाद :शुचिता नांदापूरकर-फडके
वनवासातल्या वास्तव्यादरम्यान राम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व स्थानांचा शोध घेत प्रवास केला तर…? अशी विलक्षण कल्पना लेखकद्वयीला सुचली आणि लागलीच त्यांनी आखणी करायला घेतली. आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास… अयोध्या… दंडकारण्य… पंचवटी… किष्किंधा… रामेश्वरम आणि मग श्रीलंका…
या प्रवासात त्यांना स्थानिक लोक, पुजारी, महंत भेटले. सर्वांनी रामायणाशी जोडलेल्या अनेक आख्यायिका, कथा आणि कहाण्या ऐकवल्या. त्यातील अनेक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण तसंच रंजकही झालं आहे. प्रवासात लेखकद्वयीला असं लक्षात आलं की, या कथांच्या विविध आवृत्त्या असल्या, तरी त्यांना बांधून ठेवणारी नैतिकतेची चौकट एकच आहे !
पिढ्यान् पिढ्यांपासून भारतीय जनमानसात रुजलेल्या; लोकजीवन, सांस्कृतिक-सामाजिक अवकाश आणि भक्ती-परंपरा यांच्या संचिताचा अविभाज्य भाग झालेल्या रामकथेसोबत केलेला अनोखा शोधक प्रवासानुभव… रामाच्या पावलांवर पाऊल !
Author: Vikrant Pande, Nilesh Kulkarni | Publisher: Rohan Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 184