Description
मूळ गरिबीत जन्माला आले तरी त्याने मोठेपणी चांगले पैसे कमवावे, असे प्रत्येक पालकांना वाटत असते. त्यासाठीची तयारी बालपणापासून करणे कसे आवश्यक आहे, हे प्रा. नामदेवराव जाधव यांनी 'रिच मदार रिच सन' मधून शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्या माध्यमातून सांगितले आहे. यात जिजाऊमाता यांनी शिवरायांना मनुष्याचे विविध प्रकार, छत्रपती होण्यासाठीचे आठ गण, आयुष्यात उसाचं ध्याय ठेवणे, वेळ व संधीचा सुयोग्य वापर, गुंतवणुकीची सवय, सतत शिकण्याची वृत्ती, योग्य मित्रांची निवड, स्वयंशिस्त यावर मार्गदर्शन केले आहे. शिकूनही श्रीमंत न झोपण्याची कारणे, शून्यातून श्रीमंतीकडे जाण्याचा महामार्ग, श्रीमंतीची खरी व्याख्या, आयुष्यभर नोकरी करीत राहिल्याने गरीब राहणे, श्रीमंती व विद्वत्तेचा संबंध, प्रगतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची धमक, पैशाच्या क्रयशक्तीचा आणि पैशाच्या उपयुक्तता जाणून घेणे, पांढरे हत्ती पोसण्याचे तोटे, श्रीमंत होण्यासाठी जोखीम उचलण्याचे धैर्य, श्रीमंत होण्याचा मानसिकता आदी प्रकरणांमधून श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग यातून दाखविला आहे.
Details
Author: Namdevrao jadhav | Publisher: Rajmata Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 172