Description
पौगंडावस्थेतील मुलांच्या उमलणा-या भावविश्वाचा वेध मिलिंद बोकील यांनी या पुस्तकातून घेतला आहे. ओघवती भाषा आणि शालेय मुला-मुलींचा मनोव्यापार उलगडण्याची हातोटी ही या पुस्तकाची बलस्थाने आहेत. हा काळ आणि त्या काळातील संवेदना आपल्याला परिचित आहेत. अभ्यासाचे विषय, परीक्षा, शिक्षक, मुले आणि मुली, आई - वडील, वयानुरूप भाव-भावना हे सारे विश्व उलगडत जाते आणि नकळत वाचकही त्या विश्वाचा एक भाग बनून जातो. शाळेच्या बंद दारांआड आणि भिंतीच्या आतही पक्षांसारखी मुक्त शाळा भरते, त्या शाळेला वर्ग नसतात, भिंती नसतात, फळा नसतो, शिक्षकही नसतात, ही शाळा कोणीती, या शाळेतले शिकणे कसे असते, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे.
Details
Author: Milind Bokil | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: