'संभ्रम' हे बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगाचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे. यात रजनीश रमामाता, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे. मीरा दातारचा दर्क्षा, समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळा, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी उत्सव, काळुबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रद्धांच्या केंद्रावरील वातावरण डाक्यूमेंटरी पद्धतीने घडवले आहे. जैन समाजात अल्पवयीन मुलींनाही संन्यासदीक्षा दिली जाते. यल्लमास अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात. या अंधश्रद्धांच्या बळींचाही येथे वेध घेतला आहे. या अंधश्रद्धांचा वैचारिक परामर्ष घेणारी प्रस्तावना सुप्रसिद्ध विचारवंत मे. पुं. रेगे यांनी लिहिली आहे.
Author: Anil Avchat | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: