Description
फिरोज अत्यंत सावधपणे रस्त्याकडे लक्ष ठेवत होता. दोन बंगल्याच्या मधली ती मागची बाजू होती. स्पेस अत्यंत कमी होती. स्पीड ब्रेक्स जेमतेम दोन्ही कंपाउंडच्या मधून जाऊ शकत होती. डोळ्याच्या कॉर्नरमधून त्यानं 'तेजोनिधी' च्या सेंटर चा अंदाज घेतला अन ब्रेक्स दाबून कार उभी केली. पाच मिनिटं ओपन कारमध्येच बसून त्यानं चारही दिशा न्याहळल्या.
इट वॉज ऑल राइट.' हे वर्णन वाचले की लेखक सुहास शिरवळकर यांच्या वाचकाला लक्षात आल्या खेरीज राहणार नाही, की हे वर्णन शिरवळकर यांचेच आहे. शिरवळकर यांचे हे रंजक शैलीतील पुस्तक खिळवून ठेवते. फिरोज हे यातील मध्यवर्ती पात्र. यात रहस्य आहे, उत्कंठा आहे, वेग आहे. एका वेगळ्या वातावरणात घडलेली ही कहाणी आहे.
Details
Author: Suhas Shirvalkar | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: