शोध भारताचा – जवाहरलाल नेहरु
“शोध भारताचा या पुस्तकातून एका महान देशाच्या गौरवशाली अशा
बुद्धिमंत आणि आध्यात्मिक परंपरेचे वाचकांना आकलन होते. “
–
• अल्बर्ट आईन्स्टाईन
अहमदनगरच्या किल्ल्याच्या तुरुंगात ५ महिन्याहून अधिक काळ अटकेत
असताना शोध भारताचा या अभिजात ग्रंथाचे लेखन पंडित जवाहरलाल नेहरू
यांच्याहातून झाले. या पुस्तकाचे प्रकाशन सर्वप्रथम १९४६ साली झाले होते.
या ग्रंथाचा आवाका अफाट आहे आणि विद्वत्ता विलक्षण आहे. भारताच्या
इतिहासातील एका महान व्यक्तीने आपल्या देशाच्या समृद्ध आणि गुंतागुंतीच्या
भूतकाळाचे विहंगमदृश्यच या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर उलगडले आहे. लिखितपूर्व
इतिहासकाळापासून ते ब्रिटिश वसाहतवादी सत्तेच्या शेवटच्या काळापर्यंतचा
इतिहास यात त्यांनी मांडला आहे. वेद, अर्थशास्त्रासारखे ग्रंथ आणि गौतम बुद्ध,
महात्मा गांधींसारखी व्यक्तिमत्त्वे यांच्यावर त्यात विश्लेषणात्मक भाष्य केले असून
आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः एक पुरातन संस्कृती सजीव केली आहे. याच
देशात तत्त्वज्ञान विज्ञान आणि कलाक्षेत्रातील काही जागतिक महान परंपरा
उमलल्या होत्या. जगातले बरेचसे मुख्य धर्मही येथेच उदयास आले होते.
नेहरूंची तेजस्वी बुद्धिमत्ता, त्यांच्या मनातील माणुसकीचा खोल झरा आणि
सुबोध – प्रवाही लेखनशैली यांच्यामुळे शोध भारताचा हा ग्रंथ वाचनीय होतो.
ज्या-ज्या कुणाला भूतकालीन आणि वर्तमान भारत जाणून घेण्याची इच्छा आहे
अशा सर्वांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
जवाहरलाल नेहरु आत्मकथा
आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याचे भवितव्य यांच्याशी जवाहरलाल नेहरूंचे जीवन अतिशय जवळून जोडले गेलेले आहे. ही त्यांची आत्मकथा १९३४-३५ या काळात ते तुरुंगात असताना लिहिली गेली. ती एका व्यक्तीच्या वैयक्तिक कहाणीहूनही अधिक आहे. एका देशात घडून आलेली राजकीय जागृती, ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा त्या देशाने दिलेला लढा हे तर यात दिसून येतेच; पण त्याशिवाय ‘आधुनिक समाज’ म्हणून स्वतःला घडवण्याचा आणि त्याच बेळी भूतकाळातील सांस्कृतिक आणि आर्थिक बेड्यांपासून सुटका करून घेण्याचा शोधही दिसून येतो.
हे लेखन असामान्य वाक्पटुत्व आणि प्रांजळपणाने लिहिले असून त्यात महात्मा गांधी आणि चळवळीतले अन्य नेते यांचे अत्यंत नेमके वर्णन केले आहे आणि ते करताकरता स्वतः लेखकाचे व्यक्तिचित्रच त्यातून रेखाटले गेलेले आपल्याला दिसून येते. आपल्याला कळून येते की, लेखकाचे व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचे आणि आत्मपरीक्षणात्मक आहे, त्यांचे मन अत्यंत बुद्धिमान आणि शोधकवृत्तीचे आहे. त्यांचे निसर्गाप्रति गहन प्रेम, जीवनाची अत्यंत ओढ या गोष्टी आपल्याला यातून दिसून येतातच; पण त्याहूनही अधिक म्हणजे, लोकशाही आणि निधर्मीपणा यांच्याप्रति त्यांची उत्कट बांधिलकी आहे, हेच आपल्याला दिसून येते.
Author: Jawaharlal Nehru | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: