या पुस्तकामध्ये मॅटिमोर यांनी २१ दिवसांची एक शिस्तबद्ध आणि क्रिएटिव्ह प्रोसेस दिली आहे. ही प्रक्रिया वापरून प्रत्येक जण एक वेगळी आणि स्वतःची अशी बिझनेस कन्सेप्ट निर्माण करू शकेल. सलग एकवीस दिवस दररोज एक तासापेक्षाही कमी वेळ देऊन तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील- १. विचार करण्याच्या क्रिएटिव्ह पद्धती आणि प्रॉब्लेम सोडवण्याची तंत्रं, जी व्यक्तिगत आणि व्यावसायिक समस्या सोडविण्यासाठी उपयोगी पडतील. तुम्हाला २. तुम्ही डझनावारी नवीन प्रॅक्टिकल कल्पना तयार करू शकाल. ज्यातून एक निवडून तुम्ही तुमचा स्टार्टअप सुरू करू शकाल. मनोरंजक व समजायला सोपे असे '२१ डेज् टू अ बिग आयडिया' हे पुस्तक उदयोन्मुख व्यावसायिकांनी वाचायलाच हवे! जे तुम्हाला तुमची सर्वोत्कृष्ट आयडिया शोधायला आणि ती प्रत्यक्षात उतरवायला मदत करेल. * एक अप्रतिम आणि प्रॅक्टिकल पुस्तक, जे तुम्हाला सर्वोच्च कल्पनेपर्यंत पोहोचवते. -बॉब डॉर्फ, द स्टार्टअप ओनर्स मॅन्युअल या बेस्टसेलिंग पुस्तकाचे सहलेखक. लेखक परिचय ब्रायन मॅटिमोर हे नॉरवॉक, कनेक्टिकट येथे स्थित 'ग्रोथ इंजिन' या इनोव्हेशन एजन्सीचे सहसंस्थापक आहेत. ब्रायन यांनी आतापर्यंत हजारो ब्रेनस्टॉर्मिंग सत्रं घेतली आहेत. पेप्सी, यूनिलिव्हर, फोर्ट यांसारख्या अनेक कंपन्यांसाठी दोनशेच्या वर इनोव्हेशन प्रोजेक्ट्रा हाताळले आहेत. डार्टमाऊथ येथून विशेष योग्यतेने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले ब्रायन हे क्रिएटिव्हिटी ट्रेनिंग गेम्स व ब्राईट आयडिया याचेही प्रणेते आहेत.
Author: Brian Matimore | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160