अघळपघळ (Aghalpaghal)

By: Pu La Deshpande (Author) | Publisher: Mauj Prakashan

Rs. 320.00 Rs. 300.00 SAVE 6%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

खळाळून हसत दिवस प्रसन्न करणाऱ्या १२ लेखांचा हा संग्रह आहे. अर्थातच पु. लं. देशपांडे यांच्या खास शैलीत शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचे भांडार त्यातून खुले होते. या विनोदाला दृश्यात्मकता असल्याने प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहण्याची किमया या लेखांनी साधली आहे. या लेखांची शिर्षकही आगळीवेगळी.

काही साहित्यिक भोग, प्रा. विश्व. अश्व. शब्दे, माझा एक अकारण वैरी, माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने, मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास ही शिर्षके उत्कंठा निर्माण करतात. काही (बे)ताल चित्रे या लेखात केरवा, दादरा, एकताल, झपतालावर आधारित शब्दचित्रे उभी करतात. ती दाद द्यावीत अशीच!

पु. ल. देशपांडे यांचं शब्दलेणं आणि वसंत सरावते यांचं मुखपृष्ठ आणि रेखाचित्र लाभलेलं हे पुस्तक म्हणजे जपून ठेवावं असा ठेवा आहे, मी आणि माझे पत्रकार, काही साहित्यिक भोग, आमचे भाषाविषयक धोरण, मी : एक मराठी माणूस, माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने, विनोदी लेखन हे साहित्य आदी आदी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक मनमुराद हसवतं.

या सर्व लेखांची सुरवातही आगळीवेगळी. एकेकाचं मराठी मध्ये ते सुरवात करतात, '...यापुढे बायाबापड्यांनी मराठी लिहिलं पाहिजे. मराठी साहित्य संमेलनातील एक अध्यक्षीय आदेश. 'माझा एक अकारण वैरी'मध्ये ते लिहितात, 'माझ्याविषयी समाजात तसे कुठेही गैरसमज नाहीत. कचेरीत मी अजातशत्रू आहे. या साऱ्या अक्षरघनाचा साज रेखाचीत्रांमुळे खुलला आहे.

Details

Author: Pu La Deshpande | Publisher: Mauj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 170