तो फिरत फिरत इकडेच का आला, याला काही कारण नव्हतं. स्वतःच्य विचारांमध्ये हरवून, पाय नेतील तसा तो चालत राहिला होता. आणि शेवटी समो समुद्रच आला म्हणून; नाहीतर तो आणखी दोन-चार मैलदेखील चालत राहिल्य असता. त्याच्या उद्विग्न मनानं चालणं ही कृती पकडली होती, इतकंच ! समुद्रकिनाऱ्यावरचा थंडगार वारा... फेसाळत उधळणाऱ्या लाटा... लाटांच्य संतप्त गर्जना... आणि त्याचं एकटेपण. छान वाटलं. वाळूत लोळत, त्याने सिगारेट शिलगावण्याचे प्रयत्न सुरू केले. ते एक आव्हानच होतं. वारं असं काही व्रात्यपणे कुठूनही, कसंही घुसत होतं की काडी पेटल्याक्षणी विझत होती. शेवटी, पाचव्या काडीला सिगारेट पेटली, नि त्या विजयाचाही त्याला अभिमान वाटला. सिगारेटचे दीर्घ झुरके मारत तो छानपैकी उताणा पडून राहिला. दुसरी सिगारेट मात्र त्याने लक्षात ठेवून पहिल्या सिगारेटच्या थोटकावर पेटवली. पाठोपाठ तिसरी... मग चौथी... पाचवी... शेवटी सिगारेट अतिशय काळजीपूर्वक... बोटाला चटका बसेपर्यंत ओढली... मग शांतपणे, आकाशातले तारे मोजत, वाळून पडून राहिला. बरं वाटलं. मनाचा तडफडाट जरा कमी झाला. त्याचं हे नेहमीचं तंत्र होतं. डोक्याला ताप झाला, की घरातून उठायचं आणि भटकंतीला सुरुवात करायची. तास... दोन तास... चार तास... डोकं शांत झालं, की नव्या उत्साहानं घरी परत, की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! "मरतपण नाही साली!" तो स्वतःशीच; पण मोठ्यानं म्हणाला.
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 208