अनिल अवचट यांनी काही वर्षांपूर्वी ‘प्रश्न आणि प्रश्न’ हे पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाने मराठी वाचकांना त्यांच्या विचारविश्वापलीकडच्या प्रश्नांची ओळख करून दिली होती. त्यांचे डोळे उघडले होते.
आता अवचटांनी आपल्यासमोर ‘आणखी काही प्रश्न’ मांडले आहेत. त्यात एड्सग्रस्तांचे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, बर्न्स वॉर्डमध्ये होरपळणाऱ्या बायकांचा आक्रोश आहे. डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्यांचं घाणीत रुतलेलं जग आहे, घटस्फोटितांच्या मुलांची ससेहोलपट आहे, ऊसतोड कामगार आणि ट्रक ड्रायव्हरांचं भिरकावलेलं जीणं आहे. त्याचबरोबर आडवी-तिडवी वाढणारी गावं. मोठ्या धरणांनी तयार केलेले प्रश्न, विजेच्या अतिवापरामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास, नगदी पिकांच्या हव्यासापोटी नापीक होत चाललेल्या खारपड जमिनी या प्रश्नांचा वेधही त्यांनी घेतला आहे.
Author: Anil Avchat | Publisher: Samakalin Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160