Description
प्रा. प्रवीण दवणे त्यांच्या सौंदर्यशोधाच्या मोहिमेत रामकृष्ण, विवेकानंद, रवींद्रनाथ, आचार्य विनोबा, आचार्य धर्माधिकारी, जे. कृष्णमूर्ती आणि ओशो या सप्तर्षीच्या जीवनदृष्टीकडे वळले, हे स्वागतार्ह प्रसादचिन्ह आहे. त्यांची सहजसलील भाषाशैली व शब्दसौंदर्य यांचा वाटा पुस्तकाच्या रुचिरतेत मोठा आहे. याच सात चिंतकांची निवड प्रा. दवणे यांनी का केली असावी? या सर्वांचे चिंतन सखोल व तलस्पर्शी आहे. त्यांच्या विचारांचे आवाहन बुद्धीला चटकन पटते, पोचते. पण या सर्वांचा पिंड केवळ वैचारिक नाही. त्याला रसज्ञतेचीही किनार आहे याचे कारण हे सर्वच जण सौंदर्यपूजक आहेत. -प्राचार्य राम शेवाळकर
Details
Author: Pravin Davane | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 143