भांडवलशाही जगासाठी जसा साम्यवाद्यांचा जाहीरनामा आहे, तसेच भारतासाठी ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ आहे. – आनंद तेलतुंबडे, ‘रिपब्लिक ऑफ कास्ट’ चे लेखक
१९३६ मध्ये एका हिंदू सुधारणावादी गटाने अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आणि जातिव्यवस्थेच्या अंताचा मार्ग दाखवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं, जेव्हा त्यांनी मांडलं की, ‘जातींची अनैतिक व्यवस्था ही वेद आणि शाखांनी टिकवलेली आहे आणि त्यांना सुरूंग लावल्याशिवाय कुठल्याही सुधारणा होऊ शकत नाहीत’, तेव्हा या गटाने आपलं निमंत्रण मागे घेतलं. त्यासाठी तयार केलेलं आपलं भाषण डॉ. आंबेडकरांनी स्वत थ्या बळावर प्रकाशित केलं. या डिवचणीला महात्मा गांधींनी प्रत्युत्तर दिलं. हा बाद कधीच संपला नाही. ही नवी, टिपणांसह आलेली सुधारित आवृत्ती या वादावरील अरुंधती रॉय यांची एक समावेशक प्रस्तावना देते. ‘आंबेडकरांविषयी लिहिताना गांधींकडे दुर्लक्ष करणं हे आंबेडकरांसाठी हानिकारक आहे’, असं त्या म्हणतात. या आवृत्तीने भारतीय समाजातील राजकीय प्रतिनिधित्व, जात, विशेष अधिकार आणि सत्ता यांच्याबद्दल अपरिहार्य असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ हा शांततेचा भंग आहे.
Author: B. R. Ambedkar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 368