Description
स्त्री आणि पुरुष... जगन्नियंत्यानी निर्माण केलेली ही सुरेल नाती... त्यांनी एकमेकांच्या सहवासात आयुष्य सुंदर करावं एवढीच माफक अपेक्षा त्यानं ठेवली. पण पुरुषाला अहंकाराचा दंश होतो अन् विषाचे भोग भोगावे लागतात स्त्रीला... जगणंच संपून जाई पर्यंत मग ती त्या जहाल विषाच्या यातनांनी तडफडत राहते... पुरुष मात्र एकापाठोपाठ एक काठेरी कुंपण उभी करुन तिचा तडफडणारा जीव 'बंदिस्त' करू पाहत असतो...
मात्र एक वेळ अशी येतेच... तेव्हा पुरुषाच्या डोळ्यापुढे फक्त अंधार असतो अन् बंदिस्त कुंपणापलीकडे सावरणारं कोणीच नसतं!
Details
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 180