Be The Change - भ्रष्टाचाराशी लढा (Be The Change - Bhrashtacharashi Ladha)

By: SUPRIYA VAKIL (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 150.00 Rs. 145.00 SAVE 3%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

भ्रष्टाचार, भारतीय शासनकारभाराच्या यंत्रणांत इतका खोलवर झिरपला आहे, की सामान्य माणसाचा सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेवरचा विश्वासच उडाला आहे. इथली राजकीय, तपासविषयक व कायदा यंत्रणा संपूर्णत: दुरुस्त झाल्याशिवाय भ्रष्टाचाराचा हा प्रचंड फैलावलेला आजार बरा होणार नाही.आज आपल्याला, आपल्या अवतीभोवती काय दिसतं? फक्त लूटालूट प्रचंड लूटालूट... आपण आकड्यावरची शून्यं मोजू शकणार नाही इतकं याचं भयंकर स्वरुप आहे...आणि राष्ट्रकुल स्पर्धेतला प्रकार उघडकीस येऊ लागला तेव्हा मला त्या प्रकारचा भयंकर त्रास होऊ लागला. त्याविरोधात उठवणा-या आवाजात मीही सहभागी होऊ लागले. आता हा आवाज आज खूप मोठा झाला आहे. कधीकधी तो फार कर्कश होतो.. पण मुद्दाम नाही, परिस्थिती भाग पाडते. पण हे सगळं चाललं आहे ते एकाच उद्देशासाठी ... सुराज्य भारत घडवण्यासाठी ... आपल्या सर्वांना समृद्ध आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सुरक्षितता देणारा अधिक चांगला भारत घडवायचा आहे. या लेखसंग्रहामागची प्रेरणा तीच आहे.जर भ्रष्टाचारी लोक त्यांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात तर त्यांचा बळी ठरणारे आपण सर्वजण आपल्या स्वत:साठीच का एक होऊ शकत नाही? ‘बी द चेंज!

Details

Author: SUPRIYA VAKIL | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 148