इंडियाज एन्शन्ट पास्ट हे प्राचीन भारताचा इतिहास सांगणारे सुलभ आणि सर्वसमावेशक पुस्तक आहे. इतिहासाच्या लेखन करण्याच्या रचनेच्या संबंधातील मांडणीतील दृष्टिकोन, स्रोत, आणि त्यांचे महत्त्व यांपासून सुरुवात करून संस्कृती, साम्राज्ये आणि धर्म यांची सुरुवात कशी झाली ? त्यांचा विकास कसा झाला? याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे. तसेच भूगोल, पर्यावरण आणि भाषिक पार्श्वभूमी यांचाही विचार केलेला आहे. त्या संदर्भात नव-पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, वेदकाळ, त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीची माहिती समाविष्ट केली आहे. या पुस्तकात लेखक जैन, बौद्ध या धर्मांचा उदय, मगध आणि प्रादेशिक राज्यांचे आरंभ आणि मौर्य, मध्य आशिया खंडातील देश, सातवाहन, गुप्त, आणि हर्षवर्धन यांचे कार्यकाळ या सगळ्यांचा समग्र ऊहापोह करतात.
Author: R. S. Sharma | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 370