१८५७च्या बंडापूर्वी ७५ वर्षे, आदिवासींनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला होता. त्या वेळी आदिवासी धनुष्यबाण, भाले ही त्यांची पारंपरिक शस्त्रे वापरून लढले होते. एकोणिसाव्या शतकात ज्या राजकीय चळवळींचा इतिहास आपण वाचतो, त्यांची सुरुवात या आदिवासी बंडखोरांनी त्यापूर्वीच केली होती. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्याला दुर्गम भागात, जंगलात आदिवासींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाची नोंद घेणे महत्त्वाचे ठरते. इतिहासाच्या पुस्तकात वर्णन केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या मुख्य प्रवाहाला समांतर असे हे लढे आदिवासी लढत होते, याचीही दखल घ्यायला हवी. ‘भारतातील थोर आदिवासी क्रांतिकारक’ हे पुस्तक म्हणजे ब्रिटिश आक्रमणाला आव्हान देणाऱ्या अनाम नायकांच्या शौर्याला मानवंदना देण्याचा छोटासा एक प्रयत्न आहे
Author: Tuhin A. Sinha & Ambalika | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 183