Description
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तगण 'ब्रह्मांडनायक' म्हणून ओळखतात. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असे आशीर्वचन देणार्या स्वामी समर्थांचे जीवनकार्य अलौकिक आहे. जगाच्या कल्याणार्थ भूमीवर अवतरलेला हा ईश्वरी अवतार! त्यांचे पूर्वावतार, स्वामी समर्थ अवतारातील जीवनकार्य, त्यांच्या लीला, भक्तजनांवर त्यांनी केलेला कृपावर्षाव, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांची समाधी लीला व समाधीनंतरही त्यांचे अस्तित्व या सर्वांचा विस्तृत आणि सप्रमाण आढावा या चरित्रग्रंथात घेतला आहे. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच साधक व चिकित्सक अभ्यासकांनाही हा ग्रंथ निश्चितच वाचनीय व उपयुक्त वाटेल.
Details
Author: Dr. Yashwant Patil | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 570