अत्यंत गडबड आणि धावपळीच्या अशा त्या जानेवारी महिन्यात एक वयस्क वाटणारे गृहस्थ अल्फाच्या दारावर येऊन ठेपतात. त्यांचं म्हणणं आहे, की त्यांच्या वडिलोपार्जित, ब्रिटिशकालीन बंगल्यात एक गुप्त खजिना दडलेला असण्याची शक्यता आहे. अल्फाने तो खजिना शोधण्यात मदत करावी असा त्यांचा आग्रह आहे. पण अल्फाच्या डोक्यावर इतर अनेक प्रकरणांचा भार असल्याने तो त्या गृहस्थाला मदत करण्यास नकार देतो. पण काही दिवसांनी अल्फापर्यंत खबर येऊन पोचते - त्या वयस्क गृहस्थाचा त्याच बंगल्यात रहस्यमयरित्या खून झाला आहे! आणि साहजिकच, अल्फासमोर त्या प्रकरणाचा शोध घेण्याखेरीज पर्याय उरत नाही. तो खून त्या खजिन्यासाठीच झाला आहे का? असेल तर बंगल्यातल्या खजिन्याबद्दल आणखी कुणाला कळलं होतं? आणि कसं? एकमेकांत गुंतलेले किष्ट पुरावे आणि घटना यांचं विश्लेषण करत असताना अल्फाच्या मनात आणखी एक प्रश्न सुरुवातीपासून आव्हान देत उभा आहे. तो म्हणजे, ते गृहस्थ ज्या खजिन्याबद्दल सांगत होते, तो खरोखरच अस्तित्वात आहे का?
Author: Saurabh Vagale | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 171