'फिरोदिया इंडस्ट्रीजचे मालक श्री. रजत फिरोदिया यांच्या पी.ए.चा बांद्रयातील त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये रात्रीच्या वेळी खून झाला आहे. किचनमधील जेवण आणि डायनिंग टेबलवरील प्लेट्स यावरून कोणीतरी रात्री त्याच्याकडे जेवायला आलं होतं, हे स्पष्ट होतंय, पण सोसायटीच्या वॉचमनने किंवा शेजारच्या पलॅटधारकांनी कुणालाच तिथे आलेलं पाहिलं नाही. त्या रात्री तिथे घडलेल्या घटना म्हणजे एक रहस्यच आहे. मुंबईत दुसरीकडे एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला सेकंड हँड खरेदीत एक स्टडी टेबल मिळालंय, ज्याच्या खालच्या बाजूला एक गूढ मजकूर लिहिलेला आहे- 'अमर-अकबर-अँथनी यांच्या पापांचा घडा भरला. आता त्यांना मरावं लागेल.' त्या टेबलाचा मालक अज्ञात आहे. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का? बांद्यात झालेला खून म्हणजे याच मालिकेतला 'अमर'चा खून होता का? आणि तसं असेल, तर गुन्हेगाराच्या लिस्टवर पुढचे दोघंजण कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना अल्फाच्या बुद्धीचा कस लागणार आहे! नक्की वाचाः डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'अमर-अकबर अँथनी' कोडं
Author: Sourabh Wagle | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 128