धर्माचा विचार हा आता केवळ एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित राहिला आहे का, याचं उत्तर नाही असं द्याव लागेल. कारण आता धर्म हा व्यक्तिकेंद्रि न राहता तो समाज-अर्थ-राजकारण या सगळ्यांशीच जोडला गेला आहे. धर्माचं झालेलं व्यापारीकरण देवस्थानांच्या बदललेल्या स्वरूपावरून दिसतं. शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, शनीशिंगणापूर, सिद्धीविनायक अशीच काही देवस्थानं. त्यावर युनिक फीचर्सनं पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. संबंधित देवस्थानाचा इतिहास, तिथली कर्मकांड, बदलेलं स्वरूप, पुजाऱ्यांमधील वाद, अर्थकारण, कथित गैरव्यवहार, आसपासचा परिसर आणि त्या सगळयांना जोडणारे भाविक अशा टप्प्याटप्प्यानं धर्मकारण उलगडत जातं. धार्मिक स्थळं राजकीय सत्ताकेंद्र कशी बनत गेली, याचं दर्शन त्यातून घडतं.
Author: Unique Features, Suhas Kulkarni, Manohar Sonawane | Publisher: Samakaleen Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 188