डिजिटल मिनिमलिझम (Digital Minimalism)

By: Cal Newport (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 300.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

डिजिटल मिनिमलिझम - गोंगाटाने भरलेल्या जगात गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची निवड मागील दोन दशकांत तंत्रज्ञानाने आणि विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाने आपले संपूर्ण जगच व्यापले आहे. ते इतके की आपण सारेच त्याच्या अक्षरशः आहारी गेलो आहोत. तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे की आपण तंत्रज्ञानासाठी आहोत? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडायलाच हवा ! डिजिटल उपकरणे, साधने आणि समाज माध्यमांनी मानवी जीवन-संबंधांचा, मनांचा ताणाबाणा पार विस्कटून टाकला आहे. या वातावरणात शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या नव्या प्रश्नांनी डोके वर काढावे, यात नवल ते काय. कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईल, टॅब यांसारख्या उपकरणांच्या माध्यमातून सर्वप्रथम समाज माध्यमांचे बोट धरणाऱ्या अमेरिका किंवा युरोपच्या पाश्चात्त्य जगताला या समस्येचे चटके थोडे अगोदर जाणवले आहेत. लेखक कॅल न्यूपोर्ट यांनी ते अतिशय प्रभावीपणे या पुस्तकात मांडले आहेत. पण भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये यापेक्षा काय वेगळी परिस्थिती आहे? दैनंदिन जीवनावर कुटुंबप्रधान संस्कृती, सामुदायिकता आणि सामाजिकतेचे वेगळेपण जपलेल्या भारतीय जनमानसावर या समस्येचा प्रभावही विशेषच असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. इंटरनेटच्या युगात जन्माला आलेली आजची पिढी डिजिटल उपकरणे आणि समाज माध्यमांच्या विळख्यात पुरती अडकल्याचे भेसूर चित्र इथेही आहेच! प्रत्यक्ष संवादाची व संभाषणांची जागा आता डिजिटल संवादाने घेतली आहे. कौटुंबिक आणि सामाजिक तुटलेपण वाढले आहे. या परिस्थितीत लेखक कॅल न्यूपोर्ट यांनी मांडलेले प्रयोगसिद्ध असे 'डिजिटल मिनिमलिझम'चे तत्त्व आशेचा किरण ठरावे. आपल्या जीवनात डिजिटल उपकरण व समाज माध्यमांना केवळ उपयुक्ततेच्या कसोटीवर पारखून मर्यादित स्थान देण्यासह डिजिटल नव्हे तर परस्पर संभाषणांवर आधारित सामाजिकता जोपासण्याचे कळकळीचे आवाहन हे पुस्तक करते.

Details

Author: Cal Newport | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 256