Description
रहाटगाडग्यात हरवलेला मोकळा श्रास शोधण्यासाठी
रानाचा, रानफुलांचा सुगंध भरभरून घेण्यासाठी,
डोंगरदऱ्यातून हिंडत निसगचि विशालपण अनुभवण्यासाठी,
आणि आपलं 'मी' पण विसरून सहज निसर्गमय होण्यासाठी
अधून मधून निसर्गात जायलाच हवं,
तिथत्या या डोंगरवाटांवरून फिरायलाच हवं.
मग अनुभवता येतं डोंगरदऱ्यातलं खडतर जीवन,
त्यांची तुटपुंजी मिळकत , त्यांची सुखंदु:खं,
तरिही, त्याचं हसतमुख जगणं आणि श्रीमंत आदरातिथ्य.
डोंगरवाटांवरच्या अशा अनुभवांची शिदोरी कधीतरी
आयुष्यालाच एक चांगली दिशा देऊन जाते.
मग आपसूकच,
या डोंगरवाटांची कायमचीच वहिवाट होऊन जाते..
Details
Author: Shekhar Rajeshirke | Publisher: Srujanrang Prakashan | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 275