दुसरे महायुद्ध एकूण २१७४ दिवस चालले आणि त्यात ५० दशलक्ष माणसे ठार झाली. हे महायुद्ध का झाले?अॅक्सिस राष्ट्रे हे युद्ध का हरली?
जर त्यांनी वेगळ्या युद्धनीतीचा अवलंब केला असता, तर ते जिंकले असतेका?
श्री. रॉबर्ट्स यांनी लिहिलेला या महायुद्धाचा हा नवीन इतिहास नावाजला गेला आहे. पश्चिम आघाडी ते उत्तर आफ्रिका, बाल्टिक ते अतिपूर्व या आघाड्यांवर चाललेल्या युद्धाची लेखक आपल्याला कथा सांगतोय – युद्धनीती आणि वैयक्तिक अनुभव, क्रूरता आणि शौर्य यांच्या कथा, यासारख्या पूर्वी सांगितल्या गेल्या नसतील. लष्करी इतिहास म्हणजे नकाशे व त्यावरच्या रंगीबेरंगी पेन्सिलीच्या खुणा एवढेच नसून थकलेल्या, तहानलेल्या, ज्यांचे पाय पायपीट करून सुजलेले आहेत व खांदे बंदुकीच्या वजनाने वाकले आहेत त्या सैनिकांची ही कहाणी आहे…’
जयंत कुलकर्णी
Author: Roberts Andrew | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 639