शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे 300 -४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युध्तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याव्दारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी 'गनिमी कावा' या पुस्तकातून दिली आहे. गनिमी काव्याने लढण्याचा मुख्य हेतू, त्याचे नियोजन, उद्दिष्टे प्रथम विषद केली आहेत. मराठयांनी या युद्धतंत्राचा वापर केलेल्या प्रसंगांची जंत्री यात दिली आहे. शिवाजी महाराजांनी केलेली सैन्य रचना व व्यवस्थापन, गनिमी काव्यात राखली जाणारी शिस्त, गनिमी काव्यासाठी नैसर्गिक गोष्टी व पारीस्थितीचा महाराजांनी केलेला उपयोग, रणक्षेत्राची अचूक निवड याची माहिती दिली आहे. शिवरायांची पहिली लढाई, पहिला छापा, प्रतापगडाचा प्रसंग, उघड्या मैदानातील पहिली लढाई, पन्हाळ्याहून सुटका, उंबरखिंड, लालमहालातील पराक्रम, सुरतेवर चाल, पहिली आरमारी मोहिम अशा विविध मोहिमा, युद्ध व शत्रूला नामोहरम करण्याच्या रणनीतीबद्दल सांगितले आहे.
Author: Namdevrao Jadhav | Publisher: Rajmata Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 502