गप्पागोष्टी (Gappagoshti )

By: D. M. Mirasdar (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 200.00 Rs. 189.00 SAVE 6%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

‘माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय’मधला नायक आपल्या बौध्दिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी ‘कैलासवासी’ झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणार्यांना खेडेगावाबद्दल किती गैरसमज असतात याचा उपरोधिक शैलीत समाचार ‘खेड्यातील एक दिवस’मध्ये आढळतो... भिकू इंगळे कारकून होण्यापेक्षा मास्तरकी करण्याचं ठरवतो आणि त्याचा ‘एका वर्गातील पाठ’ आयुष्यभराचा धडा ठरतो!... आणि पुण्यातल्या जलप्रलयाने हळहळलेली भोकरवाडीतील मंडळी मदत मागायला निघतात आणि त्यांनाच ‘मदत’ करायची पाळी येते... केस हरणार असं ठाऊक असूनही केवळ प्रतिष्ठेकरिता केस लढणारा, दिलदार पण इरसाल ‘गणपत पाटील’ शेवटी सखूला माफ करतो, तर गणपत वाघमोडे वेगळीच शक्कल लढवून ‘निकाल’ आपल्या बाजूने लावून घेतो... मानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या ‘गप्पागोष्टी’च वाटतात.

Details

Author: D. M. Mirasdar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 148