गरागरा गरागरा (Garagara Garagara )

By: Anant Bhave (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 25.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

छोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी 

वेगळयाच दिसतात. 

त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा 

काहीसं वेगळं असतं - असू शकतं, 

अशी माझी समजूत आहे. 

त्या गोष्टींचं वर्णन करताना, 

त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, 

मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत 

अशा चित्रविचित्र कल्पना 

आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा 

निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, 

कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा 

भाषा ती उधळतात. 

मुलांचं हे मूलपण 

माझ्या कविता-गाण्यांतून 

खेळवण्याचा खटाटोप 

आधीच्या ५ संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. 

हा एक ब-यापैकी उपक्रम आहे 

अशी पावती मुलांच्या शाळांतून 

आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या 

गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून 

मला वेळोवेळी मिळते आहे. 

नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. 

Details

Author: Anant Bhave | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 24