या पुस्तकातून अदानींच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या बालपणीबद्दलच्या रंजक गोष्टी, व्यवसायामध्ये त्यांचा झालेला शिरकाव, त्यांचं कुटुंब, लग्न अशा विविध गोष्टींबद्दल या पुस्तकात सांगितलेलं आहे. तसंच, विविध व्यावसायिक धोरणांचं विश्लेषण ते कसं करतात, संधी कशी हेरतात आणि चुकांतून कसं शिकतात, याचीही उदाहरणं या पुस्तकात आहेत. या त्यांच्या गुणांमुळे अदानी यांनी त्यांच्या कंपनीला यशाच्या मार्गावर तर नेलंच; पण त्यांनी सर्वांसाठीच एक उदाहरण घालून दिलं आहे.
भारताचे एक ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी गौतम अदानी यांच्या कारकिर्दीचा अनेक वर्ष पाठपुरावा केला आहे, त्या आर. एन. भास्कर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, ज्यात कथनाच्या शैलीत वास्तवाचं वर्णन केलेलं आहे.
Author: R. N. Bhaskar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 220