घर हरवलेली मानस (Ghar Haravaleli Manas)

By: V. P. kale (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 200.00 Rs. 189.00 SAVE 6%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

मुंबईसारख्या शहरात राहून आपल रोजचं आयुष्य जगणार्‍या मध्यमवर्गीय माणसांची होणारी कुचंबणा या कथातून मांडलेली आहे. चाळीतलं वास्तव्य, लहान जागा याबरोबरच विसंवादाचे उठणारे सूर यानं माणसाचं जीवन अवघड करून टाकलं आहे.
आयुष्याचं संगीत तीन स्वरात विभागलेल बालपण, तारूण्य आणि वार्धक्य. सर्वाधिक उमलण्याचा, फुलण्याचा, उत्कटतेचा काळ तो तारूण्याचा शरीराचे, मनाचे, भावनांचे, संवेदनांचे, कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ.
पण तारूण्यातच अनेक प्रकारच्या कुंचंबणेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकलेलं. अनेक संसारातून यामुळं उठलेले विसंवादाचे सूर, हे अस्वस्थ करणारे जखम करणारे.
पाचशे स्क्वेअर फूटच्या घरात 10-10 माणसं राहतात. त्यांच्यातले नाते संबंध, पतीपत्नीला हवा असेलेला एकांत, स्वस्थपणा. ही अप्राप्य गोष्ट. आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना. तीस माणसासाठी एकच संडास आणि रोजच्या नित्यकर्मासाठी करावी लागणारी रोजची धडपड हे सर्व कीव आणणारं आहे. अनंत प्रश्न उभे करणारं आहे. माणसं घरात राहतात. कधी कधी एकमेकांत कधीत न कोसळणार्‍या भक्कम भिंती उभारून अशा अनेक प्रश्नांच्या या कथा. प्रत्येकला आपल्या वाटणार्‍या ...

Details

Author: V. P. kale | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 182