'घातसूत्र' ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय - राजकीय ग्रंथ नाही . प्रबंध नाही . आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही . तत्वज्ञान नाही . आध्यात्मिक प्रवचन नाही . वा क्लिष्ट नाही चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही . दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलीकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन - प्रबोधन करणारा, पण एक उत्कंठापूर्ण, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे.
अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांचे मन खिळवून ठेवतानाच, त्याला प्रस्थापित जगाचे भान यावे म्हणून दिशादर्शन करणारे हे लेखन कोणत्याही विशिष्ट ग्रंथशाखेत मोडत नसले तरी त्यात इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, तत्वज्ञान हे सर्व रहस्यमयतेने येते. वैचारिक आत्मविश्वासही देते!
Author: Deepak Karanjikar | Publisher: Granthali | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 860