Description
या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे.
अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का
Details
Author: Purushottam Dhakras | Publisher: Rohan Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 350