Description
"प्रोफेसर साहेब, माझी एक सूचना आहे." गुंडयाभाऊ उभा राहून सोटा उंच करून बोलू लागला, "हे लग्न तुम्हाला शारीरिक सुखांकरिता करायचं नाही ना?" "नाही, नाही, नाही. त्रिवार नाही." प्रोफेसर. "तर मग एखादया तरुणीशीच लग्न करायचा अट्टाहास का? "गुंडयाभाऊ म्हणाला," माझ्याशी करा. मी बौद्धिक जीवनाकरिता तुमच्याशी लग्न करायला तयार आहे." त्याची विक्षिप्त योजना ऎकून कित्येकजण हसू लागले, तर कित्येक चकित होऊन तोंडाचा चंबू करून एकमेकांकडे पाहू लागले.
Details
Author: C V Joshi | Publisher: Deshmukh and Company Publishers Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 126