हसत जगावं ताण-तणावांचा ‘अभ्यास’ पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं ‘इन्स्टंट’ उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला;
पण या ताण-तणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय, भारतीय संस्कृतीलाच.
ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली ‘गीता’ आणि पर्यायानं ‘ज्ञानेश्वरी’ हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत.
काळाच्या ओघात स्वयंभू तेजस्वितेनं तळपत राहिलेल्या या ग्रंथातील तत्त्वज्ञान नित्यनूतन प्रकाश आणि आधार देतच आहे…
आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार ‘हसत जगावं’ सांगताना मोठ्या तळमळीनं, तरीही सहजपणे प्रकटतो.
आधुनिक वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची यशस्वी सांगड घालणारं आगळंवेगळं पुस्तक.
या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणावग्रस्तता भान आणि ज्ञान मानसोपचार
Author: Dr. Rama Marathe | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 234