Description
हसत राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करीत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. माझं खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पोष्टिक जीवन, पाळीव प्राणी अशा कथांमधून पु. ल. चा निखळ, खळखळता विनोद पानोपानी आपल्या भेटीला येतो. पण त्याही आधी आपल्याला भेटते ती त्यांची सही आणि त्यांनी वाचकांशी केलेलं हितगुज. ते लिहितात, 'जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक' करण्यापलीकडे आणखी काय करायचं?'
Details
Author: P. L. Deshpande | Publisher: Mouj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 157