आपण कशावर हसतोय याबद्दल विचार करायला लावणारा विलक्षण इतिहास या पुस्तकात आहे.
गोगलगायीवर बसलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवर जवाहरलाल नेहरू पावूक उगारतायंत, असं दाखवणारं शंकर यांचं 1949 सालचं व्यंगचित्र एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट होतं, त्यावरून 2012 साली बटाच गदाटोळ उडाला, दलितांनी या विरोधात निषेध नोंदवला आणि कलात्मक स्वातंत्र्याच्या निकषावर सवर्णानी या निषेधाचा प्रतिकार केला. त्यानंतर भभ्यासक व व्यंगचित्रकार उन्नमाटी श्याम सुंदर यांनी इंग्रजी वर्तमालपत्रांमधील आंबेडकरांवरच्या व्यंगचित्रांपा शोध घ्यायला सुरुवात केली. या प्रयत्नातून भारतातील आघाडीच्या प्रकाशनांमधल्या शंभरहून अधिक व्यंगचित्रांचं एक संकलन तयार झालं, शंकर, अन्वर अहमद व आर. के. लक्ष्मण इत्यादी व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्रं आहेत. आंबेडकरांना महन कटावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या चित्रांमधून उघड होतो. प्रत्येक व्यंगचित्रासोबत केलेल्या धारदार भाष्यामुळे आंबेडकरांसारख्या ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या माणसाचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.
Author: Unnamati Syama Sundar | Publisher: Madhushree Publication | Language: Mararthi | Binding: Paperback | No of Pages: 398