स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे चालते, हीलिंग म्हणजे काय, त्याचे उपयोग सांगितले आहेत.
सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या उपचारपद्धतीबद्दल लेखिकेने यात सविस्तर माहिती दिली आहे. माणसाचे शरीर आरोग्यपूर्ण बनविण्याची प्रक्रिया म्हणजे हीलिंग, अशी व्याख्या सांगून मानवी शरीररचना स्पष्ट करून सूक्ष्मस्तरावर जाऊन काम करणाऱ्या उपचारपद्धतीत सेकिम, रेकी आदींचा कसा फायदा होतो, हे यातून उदाहरणे, अनुभवांमधून सांगितले आहे. माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात ऊर्जेचे महत्त्वाचे स्थान, डिस्टन्स हीलिंग याचीही ओळख यातून करून दिली आहे.
Author: Vrushali Lele | Publisher: Vrushali Lele | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 95