"ओम अनोळखी ठिकाणी डोळे उघडतो, त्याच्या भूतकाळासंबंधीची उत्तरं तो अजून शोधतोय. दृष्ट प्रवृत्तींनी मृत संजीवनीचं पुस्तक हस्तगत केलंय, अशा परिस्थितीत जो सदाचारी आहे तो विजयी होईल? सद्गुणांचा विजय होईल? मृत संजीवनीत अशी कोणती गुपितं दडली आहेत, जी चुकीच्या हातात पडली तर गहजब माजेल आणि विनाश होईल? ओम कोण आहे? LSD चं आणि परिमलचं वास्तव काय आहे? बाकीचे चिरंजीव कुठे लपले आहेत? विचित्र, गूढ ठिकाणी विखुरलेले हे शब्द आहेत तरी काय आणि नागेंद्र ते का गोळा करतोय? मर्त्य मानव, देवता आणि दानव या सगळ्यांसाठी अमरत्वापेक्षाही मोठं उद्दिष्ट ज्यात दडलं आहे अशा शब्दांचा शोध ती अतूट त्रयी घेत असताना, त्यांच्यासोबतच ‘द हिडन हिंदू २' मधून तुम्ही कधीही न पाहिलेल्या प्रदेशांची उत्कंठावर्धक सफर करायला सज्ज व्हा."
Author: Akshat Gupta | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 234