"I can't guess!" मात्राच खुंटली! कोड्याचं उत्तर शोधा आणि उत्तर मिळू नये, तशी त्याची अवस्था झाली होती. पहाट फाकून दिवस डोकवायला लागला तरी मंदार आणि मणी एकमेकांकडे बघत बसले होते. रिझल्ट काही नाही. फ्लॅटमधील ट्यूब मात्र अजूनही जळत होती. अचानक फ्लॅटचं दार खाडकन उघडलं गेलं आणि दोघांनी एकदमच माना वळवून पाहिलं. दारात इन्स्पे. सायगल उभा होता. "दिनेश?" "मंदार, एक मिनिट बाहेर ये." दिनेश गंभीर स्वरात म्हणाला अन् 'का' विचारण्याचं धाडस मंदारला झालंच नाही. गुपचूप उठून तो बाहेर आला. "मिसेस शीला मणी सापडली." "कुठे?" "टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये!" "व्हॉट?" "होय." "प्रेत कुठाय?" "अजून माझ्या ताब्यात आहे. पोस्टमार्टमपूर्वी तुला पाहायचं असेल तर..." "चल!" मंदार म्हणाला आणि धडाधड जिना उतरून कारकडे पळत ऋणी नायर मंदार परत येण्याची वाट बघत बसला होता!
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 200