हूल (Hool)

By: Bhalchandra Nemade (Author) | Publisher: Popular Publication

Rs. 450.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description
विविध महाविद्यालयांमध्ये घडणारे विविध प्रसंग, प्राध्यापकांशी झालेल्या चर्चा, विद्यार्थांबरोबरचे संबंध, शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी, प्राध्यापकांचे उत्तरोत्तर बैल होत जाणे, वेगवेगळ्या गावांतील सामाजिक, राजकीय परिस्थिती, त्यावर विविध लोकांनी केलेली भाष्ये... चांगदेवाच्या आंतरिक प्रवासाची, मुख्य कण्याची पुढे जाणारी दिशा सोडून हा वास्तव जगातील घटनाक्रम काही वेळापुरता आडवा प्रवास करतो आणि अवकाशात पसरत राहतो. अवकाशाचा येथील उपयोग वास्तववादी दृष्टिकोनातून तपशील भरण्यासाठी झाला आहे. या अवकाशामध्ये पुनःपुन्हा त्याच ठिकाणी येणारा दैनंदिन काळच अवतरू शकतो. त्याची चक्रात्मक गतीही थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न असंख्य चर्चांनी केला आहे. या कादंबऱ्यांमधून नेमाड्यांनी 'चर्चेचा कालावकाश' हा एक नवा कालावकाश घडविला आहे. नेमाड्यांच्या चर्चा कादंबऱ्यांतील सामूहिक अवकाशांशी, वास्तव जीवनातील समस्यांशी घट्टपणे निगडीत आहेत. हे सामूहिक अवकाश आणि चांगदेवला उपलब्ध झालेला खाजगी अवकाश यांच्यातील द्वंद्व या कादंबऱ्यांमधून अत्यंत वेधकपणे मूर्त झाले आहे. चांगदेवच्या लॉजमधल्या तसेच इतर ठिकाणच्या खोल्या, त्यांचे अनेकदा सार्वजनिकतेत होणारे रूपांतर, त्याने घेतलेला खोल्यांचा शोध येथे अर्थपूर्ण ठरतो. बाहेरच्या जगाचा दैनंदिन काळ आणि चांगदेवच्या व्यक्तिनिष्ठ काळामधील ताणही वरील द्वंद्वाला पूरक ठरतात. आधुनिक काळातील व्यक्तीची स्वविषयक जाणीव आणि भोवतालच्या सामाजिक वास्तवासंबंधीची जबाबदारीची जाणीव त्यांच्यातील संघर्षापासून सामानतेपर्यंतचे विविध प्रकारचे संबंध आणि ताणतणाव नेमाड्यांनी अत्यंत समर्थपणे 'बिढार', 'हूल', 'जरीला', 'झूल' च्या रुपबंधातून अभिव्यक्त केले आहेत. या कादंबऱ्यांना केवळ वास्तववादी प्रेरणा
Details

Author: Bhalchandra Nemade | Publisher: Popular Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 213