हुंकार (Hunkar)

By: V.P. Kale (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 200.00 Rs. 189.00 SAVE 6%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

‘हुंकार’ हा कथासंग्रह म्हणजे तारुण्यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखच ! तारुण्य - आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्‍फजिती कबूल करण्याचा, दुसर्‍याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरऊन वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सार्‍या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणार्‍या, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्‍या, तर कधी सरळ सत्याला भिडणार्‍या अशा या कथा आहेत.

Details

Author: V.P. Kale | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 152