इल्लम (Illam)

By: Shankar Patil (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 140.00 Rs. 133.00 SAVE 5%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

संपतरावांच्या डोक्यात एक गोष्ट गच्च बसली. अगदी सिमेंट कॉंक्रिट ! संपतराव रोज आपलंच डोकं खात बसला. पंधरा लाख देऊनही नाव होत नाही म्हणजे काय? काहीतरी इल्लम सापडलं पाहिजे... असं काय करावं? काय काढावं? काहीतरी चकित करणारं सापडलं पाहिजे... सगळ्या पेपरात बातमी आली पाहिजे. सगळ्यांच्या तोंडी आपलाच विषय निघाला पाहिजे. नावाचा डंका गाजला पाहिजे ! नाव गाजत नाही, तर मग एवढा पैसा मिळवून तरी काय फायदा? एवढे नोकरचाकर, गडीमाणसं राबतात. एकाला दोन बंगले, गदगंज इस्टेट, सोन्याचांदीची भांडी, दागदागिने, काश्मिरी कार्पेटस् सार्या जगातून आणलेल्या शोभेच्या सुंदर सुंदर वस्तू... कोणत्या गोष्टीची ददात आहे? एवढं ऎश्वर्य पायाशी लोळण घेतंय, पण त्याचा उपयोग काय? नाव नाही... एका रात्रीत नाव व्हावं, पेपरात सगळीकडं छापून यावं, असं काहीतरी इल्लम काढलं पाहिजे. आणि एक दिवस संपतरावांनी इल्लम काढलं !

Details

Author: Shankar Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 98