एका महान नेत्याने दुसऱ्या महान नेत्याला लिहिलेल्या पत्रांचा मौल्यवान संग्रह
इंदिरा गांधी जेव्हा दहा वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी तो उन्हाळा मसूरीत घालवला होता. त्याच वेळी त्यांचे
वडील, जवाहरलाल नेहरू मात्र अलाहबादला होते. त्या उन्हाळ्यात नेहरूंनी इंदिरांना पत्र-मालिका लिहिली.
त्यामधून पृथ्वी कशी निर्माण झाली, मानवी तसंच प्राण्यांचं जग कसं घडलं, आणि जगभरात सभ्यता-संस्कृती व
समाज यांचा विकास कसा होता गेला यांबद्दलची रंजक माहिती रसाळ भाषेत विशद करून सांगितली.
१९२८ साली लिहिलेली ही पत्र आजही तितकीच ताजी आणि कालानुरूप वाटतात. त्यामधून नेहरूंचं लोकांबद्दल
आणि निसर्गाबद्दल असलेलं प्रेम दिसून येतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर : ‘वाचलेल्या इतर कोणत्याही कथा किंवा कादंबरीपेक्षा ही
गोष्ट जास्त रंजक आणि विलक्षण आहे.’
Author: Jawaharlal Nehru | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 165