जात समजून घेताना हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा; ब्राम्हण्यबाद म्हणजेच हिंदू धर्म असे स्वाभाविकपणे गृहीत धरले जाते.
तर ब्राम्हण्यवाद म्हणजे बेदांवर आधारित भारतीय सस्कृती अशा धारणेवर आधारित आणि भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा आर्यांच्या परपरेतील आहे अशा समग्र गृहीतकाला ही मांडणी आव्हान देते. भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच ‘ब्राम्हण्यबादी दृष्टिकोनात’ अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा (पारंपरिक) भारतीय समाज आणि भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनाला पर्याय देणाऱ्या, दलित चळवळीतून तयार झालेल्या पर्यायी वैचारिक मांडणीचा शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
Author: Gail Omvedt | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 115