उत्तर कोरियातील वास्तवावर आधारित संघर्षमय सत्यकथा मी दोन गोष्टींसाठी आभारी आहे : एक, मी उत्तर कोरियात जन्मले आणि दोन, मी उत्तर कोरियातून निसटले. या घटनांनी माझ्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी दिली. या दोन गोष्टी इतक्या अमूल्य आहेत की, या बदल्यात कोणी मला एक सुंदर सुखी जीवन जरी देऊ केले तरी ते मी एक वेळ नाकारेन. कारण खरं पाहायला गेलं तर या दोन गोष्टींमुळेच मी आज इथवर आले आहे. पण केवळ या दोनच गोष्टी आहेत असं नाही! याव्यतिरिक्तही अजून बरंच काही आहे, जे मी आत्ता जशी आहे तसं मला घडवायला कारणीभूत आहे. आपल्या आठवणींना जिवंत ठेवण्याचा जर कोणता एकमेव मार्ग असेल, तर तो म्हणजे त्या आठवणींना कथेचा आकार देणे! अशा कथा, ज्यातून आपल्याला घडून गेलेल्या घटनांमधील गूढ प्रयोजन काय होते ते समजेल.. माझ्या या प्रवासात मी भयावह अमानुष घटना पाहिल्या आणि त्याचबरोबर कल्पनेपेक्षा वाईट परिस्थिती असूनही प्रेम, करुणा आणि बलिदानही पाहिले. मला मान्य आहे की, स्वतःच्या भल्यासाठी कधी कधी आपल्यातली माणुसकी हरवणे साहजिक आहे; पण माझा ठाम विश्वास आहे की, माणुसकी पूर्णपणे नष्ट झालेली नाही. थोडं स्वातंत्र्य आणि प्रेमाचं खतपाणी मिळाल्यास ती पुन्हा बहरू शकते. तर ही आहे माझी कहाणी. कहाणी जगण्यासाठी मी निवडलेल्या मार्गाची, जगण्यासाठी केलेल्या धडपडीची
Author: Yeonmi Park | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 272