‘जरीला’ कादंबरी ही आजच्या एकाकी पडत जाणार्या, आत्मशोधन करणार्या, जगण्याची धडपड करणार्या, जगणे म्हणजे शिक्षा वाटणार्या, छोट्या छोट्या गोष्टींसाठी रक्त आटविणार्या, संवेदनशील तरुण मनाचा प्रभावी आविष्कार आहे. ‘जरीला’ कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही. ‘जरीला’ कादंबरीतील अनुभवविश्व व त्याचा आविष्कार करणारे प्रसंग मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे प्रसंग रुढ अर्थाने अतिशय सामन्य, साधे, नित्य जीवनातले, कलाकृतीच्या संदर्भात कलामूल्य कमी जाणवणारे असे आहेत.
Author: Bhalchandra Nemade | Publisher: Popular Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 297