छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वत:चे राज्य स्थापन करू शकतो आणि ते उत्कृष्टरित्या चालवूही शकतो. महाराजांच्या मृत्यूनंतर पुढच्या शंभर वर्षात मराठी फौजांची घौडदौड पश्चिमेला पेशावरपासून पूर्वेला बंगालपर्यंत गेली.
अंधारातील इतिहासातील उजेडात आणणारे निनाद बेडेकर यांचे हे लेखन. विस्मृतीत गेलेला मराठी पराक्रमाचा हा इतिहास आहे. मराठी फौजांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा आहे. जयपूरला धडक, सूरत मार्गावरील चौक्या गुजरातेत मराठे, ग्वाल्हेर काबीज, उज्जैन, आमझेरा आदी प्रकरणांमधून तो उलगडत जातो. लाहोर, पेशावर, दिल्ली, जबलपूर, विजापूर, गुलबर्गा, झांशी, जुनागढ, कोटा आदी ठिकाणी मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती मिळते.
Author: Ninad Bedekar | Publisher: Rafter Publications | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 170