आपले जीवन हे आपल्या एकट्याचेच थोडेच असते? असंख्य व्यक्तींची साथ घेत, त्यांना साथ देत आपण पुढे जात असतो. जगण्याच्या वाटेवरील हे सोबती आपल्या अस्तित्त्वाला सौंदर्य देतात, बळ देतात, अर्थ देतात. ‘गोजी’सारख्या चिमुकल्या, निरागस मुलीपासून ते गुलजारांसारख्या विख्यात
कलावंतापर्यंत, जन्मदात्या आईपासून ते जिला जन्म दिला त्या ‘मुग्धा’पर्यंत, दीर्घकाळ सोबत चाललेल्या धर्मापुरीकरासारख्या मित्रापासून ते आयुष्याचा एक छोटासा कालखंड प्रकाशून टाकणाऱ्या प्रकाश संतांपर्यंत...पाडळकरांना भेटलेल्या असंख्य सोबत्यांपैकी काहींची ही रसरशीत शब्दचित्रे.. जीवनाच्या विविध रुपांविषयी उत्कट आस्था बाळगणाऱ्या ललित लेखकाने त्याच्या खास ‘पाडळकरी’ शैलीत रेखाटलेली आपल्या जिवलगांची ही रसरशीत शब्दचित्रे..
मराठी ललित गद्याचे एक मनमोहक रूप...
Author: Vijay Padalkar | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 165